ब्रेकिंग न्यूज

बारा पोलीस निरीक्षकांच्या पिंपरी-चिंचवडमध्ये बदल्या

Share

पिंपरी- राज्यात सुरू असलेल्या प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध युनिट्समधून बारा पोलीस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आलेले पोलीस निरीक्षक खालीलप्रमाणे

प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम (पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), विजयकुमार शिंदे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), देवेंद्र चव्हाण (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुरेखा घार्गे (मुंबई शहर), चंद्रकांत जाधव (नांदेड), राजेंद्र निकाळजे (ठाणे शहर), गोताराम शेवाळे (ठाणे शहर), सोमनाथ जाधव (छत्रपती संभाजीनगर शहर), अमोल गवळी (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे आणि शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई येथे बदली झाली आहे.

याशिवाय शहर दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या आहेत. संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलीस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात, नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, प्रदीप पाटील यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत तर तेजस्विनी कदम यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.