पुणे- पुण्याच्या MH 12 या वाहन नोंदणी कोडची ZZ ही शेवटची मालिका सुरु असून हा कोड इतिहासजमा होणार, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र हा कोड कायम ठेवण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. गडकरी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुण्याची ओळख असलेला MH 12 कायम राहणार आहे.
MH 12 या सीरिजसोबत पुणेकरांच्या भावना जोडलेल्या आहेत, शिवाय ही पुण्याची ओळख आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी (दि. ४) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. MH 12 कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये. त्याच कोड अंतर्गत पुढील पर्यायी नोंदणी मालिका सुरु करावी अशी मागणी केली.
ZZ’ मालिका संपल्यानंतर देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर (उदा. ‘1A’ सारखी अल्फान्यूमेरिक मालिका) वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
