ब्रेकिंग न्यूज

सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेचा रुपाली चाकणकर यांच्याकडून निषेध, सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमधून म्हणाल्या…

Share

मुंबई- सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

एखाद्या महिलेच्या कर्तृत्वाला उत्तर देता येत नसेल, तर तिच्यावर वैयक्तिक टीका करून तिचा अवमान करणे ही काँग्रेसची राजकीय संस्कृती आहे का? महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आज स्वतःच आपला खरा चेहरा महाराष्ट्रासमोर उघड केला आहे.

स्व.अजितदादांच्या पश्चात अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी जबाबदारी स्वीकारली,वैयक्तिक दुःखावर मात करत जनतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले.अशा एका महिलेचा सन्मान करण्याऐवजी तिचा अपमान करण्याची काँग्रेसची मानसिकता महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही.अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

रुपाली चाकणकर यांचे ट्विट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://x.com/ChakankarSpeaks/status/2084612804800372787