ब्रेकिंग न्यूज

निगडीत लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी खोलीत घडलं काय ? 

Share

पिंपरी – निगडी परिसरात एका 26 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

यश कदम असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा सोमवारी निगडीतील एका लॉजमध्ये गेला होता. काही वेळानंतर खोलीत यश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला. तपासात अशीही माहिती समोर आली आहे की यशसोबत त्या दिवशी लॉजमध्ये एक महिला उपस्थित होती. त्या दोघांमध्ये काही कारणावरुन वादही झाले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

यश याच्या आत्महत्येचा आणि झालेल्या भांडणाचा काही संबंध आहे की नाही, याचाही तपास पोलिस करत आहेत.