ब्रेकिंग न्यूज

राजमाता जिजाऊ आईसाहेबांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे – इरफानभाई सय्यद

Share

चिंचवड :स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याला घडविणाऱ्या स्वराज संकल्पक राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष इरफानभाई सय्यद, संघटनेचे खजिनदार नागेश व्हानवटे यांच्यासह दीपक पालांडे, पिंजरकर काका, पांडुरंग गव्हाणे, सुनील पाडाळे, पारवे काका, पांडुरंग कदम, दादा कदम, संकेत चावरे, समर्थ नाईकवाडे, बबन काळे, अमित पासलकर, गणेश नाईकवाडे, आयुष शिंदे, रतन भोजने तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना इरफानभाई सय्यद म्हणाले की,“राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी दिलेले संस्कार, स्वराज्याची जाणीव, समाजासाठी झटण्याची प्रेरणा आजही आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांवर चालत कामगार, सामान्य जनता व समाजाच्या हितासाठी संघर्ष करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”