पिंपरी -महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात जनसंवाद सभा घेऊन शहरातील समस्या जाणून त्याचे निराकरण केले. यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय जगताप यांनी मोहननगर प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. अजित पवार यांनी या समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. तसेच अन्य समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या जनसंवाद सभेमध्ये एकूण ४ हजार ८०० प्रकरणांची नोंद घेण्यात आली. त्यापैकी १ हजार ८०० प्रकरणे अजित पवार यांनी जागेवरच मार्गी लावली. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय जगताप यांनी मोहननगर प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. प्रामुख्याने मोहननगर, रामनगर, काळभोरनगर येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर अनेकदा तक्रारी दाखल करून देखील या तक्रारींची दखल घेतली जात नाही. थरमॅक्स चौकातील महावितरणच्या कार्यालयावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात आला होता. परंतु आजपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही. मोहननगर मधील गाय वासरू चौकातील दगडी पेव्हिंग ब्लॉक काढून डांबरीकरण करावे, श्री शिवछत्रपती कमान ते गाय वासरू चौक तसेच मेहता हॉस्पिटल चौक या रस्त्यावरील फुटपाथची रुंदी कमी करून रस्ता रुंद करण्यात यावा, मोहननगर मधील शिवदर्शन कॉलनी मधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील शिंदेशाही पगडी कडून जिरेटोप बसवण्यात यावा, मोहननगर सर्व्हे क्रमांक १३५ मधील नागरिकांनी १९८० पासून स्वतः बांधलेल्या घरांचे एमआयडीसीच्या आरक्षणामुळे अद्याप खरेदीखत होऊ शकलेले नाही. त्वरित या प्रश्नी लक्ष घालून नागरिकांच्या घरांचे खरेदीखत करून द्यावे अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.
या सर्व समस्या समजावून घेतल्यानंतर अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. संजय जगताप यांना मोहननगर परिसरातील नागरिकांच्या समस्यांची जाण आहे. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून संजय जगताप यांनी काम केले आहे. अजित पवार यांच्या जनसंवाद सभेमध्ये संजय जगताप यांच्या प्रयत्नांना आले .
