‘धन्वंतरी गोल्ड’ योजना आता नगरसेवकांना देखील लागू, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी गोल्ड’ वैद्यकीय योजना आता नगरसेवकांनाही लागू करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. स्वीकृत सदस्यांसह एकूण १३८ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. महापालिकेने जुनी धन्वंतरी योजना बंद करून २०२४ मध्ये आणलेल्या विमा योजनेवर कर्मचाऱ्यांनी तीव्र…
