देशाचे माजी राष्ट्रपती स्व डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा वृत्तपत्र विक्रेता दिन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ ( पुणे – पिंपरी चिंचवड) यांच्यावतीने रक्तदान उपक्रम राबवून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला . याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मा.श्री. विजयभाऊ पारगे , संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. दत्ताभाऊ पिसे ,संघाचे सचिव अरुण निवंगुणे ,कार्याध्यक्ष अनंता भिकुले , इतर सर्व विश्वस्त ,पदाधिकारी व विभाग प्रमुख, विक्रेते बंधू भगिनी उपस्थित होते.
संघाचे अध्यक्ष विजयभाऊ पारगे यांनी सर्व वृत्तपत्र विक्रेते करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व विक्रेत्यांनी आपल्या स्वास्थ्याची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कर्तव्य म्हणून विक्रेता संघाकडून रक्तदान , रक्तदानासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय संस्थांनी रक्तदान शिबीरास सहकार्य केले . यावेळी ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले . यावेळी रक्तदात्यांना संघनेमार्फत प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सदर प्रसंगी दैनिक ,सकाळ ,सामना ,लोकमत ,पुढारी ,प्रभात ,टाइम्स, नवभारत, दैनिक भास्कर आदी वृत्तपत्राचे प्रमुख अधिकारी,सुपरवायझर उपस्थित राहून वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. रक्तदानाच्या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडी यांनी जागा उपलब्ध करून दिली. संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिंचवड विभागातील सर्व विक्रेत्यांनी विशेष परिश्रम घेतले.
