ब्रेकिंग न्यूज

शहरातील पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्यासाठी “पर्यावरण ना-हरकत दाखला व निधी देण्यात यावा – संदीप वाघेरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

पिंपरी प्रतिनिधी :  पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदुषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याकरिता पवना व इंद्रायणी  नदी सुधार प्रकल्प  राबविण्यासाठी “पर्यावरण ना-हरकत दाखला व आवश्यक असलेला  निधी मिळावा याकरिता मी सातत्याने प्रयत्न करीत असून शहरातील इंद्रायणी नदीस काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण कमिटी मार्फत पर्यावरण ना हरकत दाखला…

Read More

एच. ए‌.  प्राथमिक शाळेत  रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

 पिंपरी वेध न्यूज –  एच. ए. प्राथमिक शाळेत १९७५ साली बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन  सुवर्ण महोत्सवी शाळेतील पहिले पाऊल व नवागतांचे स्वागत असा दुग्ध शर्करा योग असलेला कार्यक्रम नुकताच शाळेच्या ‘ रजत भवन ‘ मध्ये संपन्न झाला . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे , शहनाज हेब्बाळकर ,…

Read More

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने डाॅक्टर,सी.ए.व फार्मर्स डे सेलिब्रेशन

पिंपरी वेध न्यूज –  रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने दि.१ जुलै रोजी डाॅक्टर्स डे,सी.ए.डे व फार्मर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोटरी नवीन वर्ष २०२५-२६ ची सुरुवात गणपती पूजन, दिपप्रज्वलन व उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रो.डाॅ.संतोष मोरे, सचिव रो.डाॅ.योगश गाडेकर तसेच नवीन कार्यकारिणी सदस्य यांच्या नावाची घोषणा मावळते अध्यक्ष…

Read More

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा

मुंबई प्रतिनिधी -राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग, व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आज मंगळवारी (ता. २०) या समाजाचा जनआक्रोश मोर्चा च्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार, विविध पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी…

Read More

ऑपरेशन सिंदूरचं देशभर कौतुक,पिंपरी चिंचवड मध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन

पिंपरी प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद ,जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर व भोसरी विधानसभा शहर प्रमुख श्री.संभाजी शिरसाट यांच्या…

Read More

भोसरीतील वायरमन तुकाराम कांबळे यांचे विजेच्या धक्क्याने निधन नागरिकांना प्रकाश देणारा माणूस स्वतःच्या कुटुंबात मात्र कायमस्वरूपी करुन गेला अंधार-नागरिकांची भावना

भोसरी प्रतिनिधी :-वादळी पावसात विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या वायरमन तुकाराम कांबळे यांच्या मृत्यूला जबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भमिका कुटुंबीयांनी घेतली आहे . दोन दिवसापूर्वी वादळी पावसात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे वायरमन कांबळे हे मोशी परिसरातील गंधर्व नगरी परिसरात विद्युत खांबावर विद्युत पुरवठा सुरळीत करीत असताना त्यांना…

Read More

इंद्रायणीनगर भोसरी येथे ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) :-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त श्री साई चौक मित्र मंडळ, श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व श्री वैष्णोमाता मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे सोमवारी (दिनांक १२ मे २०२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक आप्पासाहेब गवारे आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई, यासर्वांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले. भोसरी…

Read More

संदीप वाघेरे आयोजित “शासन आपल्या दारी” उपक्रम ५ मे रोजी…

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ एकाच छताखाली घेता यावा याकरिता सोमवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १० ते ५ यावेळेमध्ये “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांसाठी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा..

पिंपरी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासाणारे व साधू संतांच्या पद स्पर्शाने…

Read More

‘गुलकंद’मध्येही हास्यजत्रेच्या विनोदांची स्वच्छता अन् शुध्दता , नाच-गाणी, धमाल किस्से, हास्य फटाक्यांनी रंगल्या दिग्गजांच्या गप्पा

पिंपरी-‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला मनस्वी आनंद तर दिलाच, उत्तम आरोग्यही दिले. संपूर्ण जगाची उलथापालथ झाली, तेव्हा प्रत्येकजण दु:खाच्या खाईत लोटला गेला होता. अशा संकटकाळात हास्यजत्रेने आधार दिला. स्वच्छ आणि शुध्द विनोद हे हास्यजत्रेचे वैशिष्ट्य आहे. अगदी तीच विनोदातील स्वच्छता आणि शुध्दता गुलकंदमध्येही आहे, अशी भावना प्रसिध्द अभिनेते प्रसाद ओक यांनी चिंचवड…

Read More