ब्रेकिंग न्यूज

औंध-बोपोडीत रंगले बाल-कलाकारांचे विश्व; स्वच्छतेचा संदेश देत सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

बोपोडी (पुणे) : नगरसेवक सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडी परिसरात ‘औंध-बोपोडी प्रभाग – स्वच्छ पुणे’ या थीमनुसार भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात आली असून, तब्बल ५८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर रंगमय करून टाकला. लहानग्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण, महापुरुषांचे…

Read More

शैक्षणिक क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांनी घेतला शिवसृष्टी येथील शिवरायांच्या पराक्रमाचा थरारक अनुभव!

पिंपरी -छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवड संचलित क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, चिंचवड या शाळेतील प्राथमिक विभागाची शैक्षणिक क्षेत्र भेट नुकतीच कात्रज येथील शिवसृष्टी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. शिवसृष्टीत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या यथासांग कार्याची अतिशय सुंदर अशी प्रात्यक्षिके आणि गड किल्ल्यांची माहिती मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता….

Read More

विकसित भारतासाठी युवा पिढीचा सहभाग आवश्यक – डॉ. गिरीश देसाई

पिंपरी- विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आजच्या युवा पिढीचा सहभाग आवश्यक आहे. युवकांनी उत्कृष्टता, प्रामाणिकपणा आणि नवोन्मेष यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. मला दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या ठिकाणी भारत देशाविषयी आणि विशेषता महाराष्ट्रातील जागतिक दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधांविषयी जागतिक दर्जाच्या गुंतवणूकदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. तेथे झालेल्या विविध…

Read More

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हेच यशाचे गमक – पद्मश्री शितल महाजन

पिंपरी- दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वतःवरचा आत्मविश्वास आणि कुटुंबाचे पाठबळ हेच माझ्या अविश्वसनीय यशाचे गमक आहे, असा कानमंत्र स्कायडायव्हिंग या साहसी खेळात जागतिक विक्रम केलेल्या पहिल्या भारतीय महिला पद्मश्री शीतल महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला. जागतिक हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त देशभर राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील…

Read More

पिंपरी चिंचवड विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त ‘दीक्षारंभ’ समारंभ

पिंपरी पुणे – आयटी अभियांत्रिकीचा विकास झपाट्याने होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट बॉट, चॅट जीपीटी हे शब्द परवलीचे झाले असून तीन चार वर्षांत तंत्रज्ञान बदलत आहे. याचा विचार करून आपली कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. तरच भविष्यातील आव्हानांचा यशस्वीपणे सामोरे जाऊन यश संपादन करता येईल, असे मार्गदर्शन सोगिती कॅपजेमिनीच्या वरिष्ठ संचालक कांचन भोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले….

Read More

जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अनेक संधी – प्रा. राव तुमाला

पिंपरी- मागील काही वर्षांत भारताने विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने विकास केला आहे. नवकल्पना, निर्मिती, उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन मायक्रो इलेक्ट्रॉनिक पॅकिंग इनोव्हेशन्सचे पुरस्कर्ते प्रा. राव तुमाला यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी…

Read More

नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कौशल्याने करा – आर्किटेक्ट मनीष बॅंकर

पिंपरी- वास्तू रचनाकाराने नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग वास्तू उभारताना कौशल्याने केला पाहिजे. वास्तू उभारताना उपलब्ध जमीन तेथील पाण्याचे स्त्रोत, विविध प्रकारची झाडे झुडपे, पशु पक्षी यांचा अधिवास धोक्यात येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल याचा विचार करून नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आधुनिक वास्तू उभी केली पाहिजे, असा कानमंत्र ताओ…

Read More

शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय; डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे मत

पुणे : शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ….

Read More

पीसीयू च्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संधी – कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी

पिंपरी, पुणे – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची आणि औद्योगिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्या अंतर्गत मलेशिया मधील युनिव्हर्सिटी टेक्नोलॉजी पेट्रोनास (यूटीपी) येथे टर्म इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी पीसीयूच्या विद्यार्थ्यांची निवड झाली हे गौरवास्पद आहे असे पीसीयू चे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी…

Read More

कोरिया मधील आयसीसीके आणि पीसीईटी यांच्या मध्ये सामंजस्य करार

पिंपरी, पुणे – कोरिया मधील आयसीसीके आणि पीसीईटी यांच्या मध्ये झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारामुळे भारतातील शैक्षणिक व उद्योग क्षेत्रास उपयोग होईल. त्यातून सांस्कृतिक सहकार्याला देखील चालना मिळेल तसेच दोन्ही देशातील संशोधन आणि व्यावसायिक विकासात अनेक नव्या संधी उपलब्ध होतील असे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. २५ जुलै) इंडियन…

Read More