राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या या तीन कारणांसाठी करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या या तीन कारणांसाठी करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकींची हत्या एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांची राजकीय वैमनस्यातून कोणी सुपारी दिली होती का, याचाही तपास केला जात आहे.
