संतनगर येथील श्री हनुमान मंदिर आयोजित, संतनगर भक्ती-शक्ती संगम एक अभिनव उपक्रमातील १७५ वे पुष्प भागवताचार्य ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांच्या सुश्राव्य किर्तनाने गुंफले.
पर्यावरण, वृक्षारोपण चे महत्व माऊलीनी १२ व्या शतकात ज्ञानेश्वरीत ओवीद्वारे सांगितले होते हा दाखला देत नगरेची वसावी l जलाशये निर्मावी l महावने लावावी नानाविध l तसेच पुराणकाळातील कण्व ऋषी व त्यांची मुलगी शकुंतला यांची झाडांविषयीची महती सांगुन मंडळाच्या या उपक्रमांचे कौतुक केले. आपल्या संतनगरच्या पूर्व बाजूला इंद्रायणीकाठी माऊली ज्ञानेश्वरांची आळंदी आणि पश्चिम बाजूला जगद्गुरू तुकोबारायांची देहू, अशा पुण्यभूमीत मोशी परिसरातील संतनगर येथे असे अध्यात्मिक उपक्रम राबविले जातात याचेही कौतुक पायगुडे महाराज यांनी केले.
संतनगर मित्रमंडळ प्रत्येक वर्षी भूगोल फाउंडेशन व इंद्रायणी सेवा संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक व अध्यात्मिक उपक्रम साजरे करतात.तसेच पर्यावरण वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, गडकिल्ले स्वच्छता, गडकिल्लेसंवर्धन, दुर्गम भागातील गरजूंना दिवाळी फराळ व दर्जेदार कपडेआणि शैक्षणिक साहित्य प्रदान करणे,प्लास्टिक मुक्त वसुंधरा व नदी स्वच्छता, जनजागरण, जनप्रबोधन इ. उपक्रम राबविले जातात. वटेश्वर महिला भजनी मंडळाचा सुश्राव्य भजन तथा भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला व नंतर कीर्तन सेवा झाली. यावेळी बोलताना ह. भ. प. संतोष महाराज पायगुडे यांनी अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. 
महाराजांनी कीर्तन सेवेत या भूमीचे संतमाहात्म्य वर्णन केले. कीर्तनाला साथसंगत हभप ज्ञानेश्वर माऊली पोखरकर यांच्या ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ खडकवाडी ता.आंबेगाव यांनी दिली.या वेळी प्रभागातील मा. स्थायी समिती अध्यक्ष विलासभाऊ मडीगेरी, मा. नगरसेवक संजय वाबळे, मा. अतिरिक्त आयुक्त व सायन्स पार्क चे संस्थापक प्रविण तुपे साहेब,मा.नगरसेवक हभप शशिकिरण गवळी, उद्योजक लक्ष्मण बालवडकर, ग्रामीण साहित्यिक लक्ष्मण वाळुंज, युवा नेते निलेश मुटके, युवा नेते शिवराज लांडगे, पर्यावरण प्रेमी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. परिसरातील मंडळाचे पदाधिकारी, सहकारी , नागरिक, महिला व मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता. मान्यवरांचा वृक्षरोपे देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल जगताप,राजेश किबिले ,चंद्रकांत थोरात,सतीश देशपांडे,उद्योजक उमाकांत पवार,राजेंद्र शेळके,उद्योजक अमर भुजबळ, साहेबराव गावडे,एकनाथ फटांगडे,शशिकांत वाडते,राजेंद्र ठाकूर,विठ्ठल वीर,अजिंक्य पोटे, अरुण इंगळे, उद्योजक पांडुरंग वाळुंज,अभिनव सागडे, कार्तिक राठोड,जयसिंग कोहिनकर, लोकेश निकम,भारत सरडे, अनिल घाडगे,संजय रसाळ,धर्मा पाटील,अशोक पोटे,यादवराव जाधव,भाऊराव अहिरे,अशोक यादव,विनायक रोंगे,सायत्रु चै्ाधरी,कृष्णा घोसर,प्रसाद वाव्हळ,जगन्नाथ माने,मच्छिंद्र बुर्डे,गणेश हजारे,ज्ञानेश आरुडे, व अनेक सहकारी सदस्य कार्यकर्ते, हितचिंतक, दानशूर व्यक्तींनी अन्नदान व देणगी रूपात आर्थिक मदत केली, सर्व उपस्थित नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.
