कौटुंबिक वादातून दोन मुलींचा वडिलांनी घेतला चावा ; चाकणमधील घटना

कौटुंबिक वादातून दोन मुलींचा वडिलांनी घेतला चावा ; चाकणमधील घटना 
Share

चाकण- कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःच्या दोन मुलींना दाताने चावे घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. २४) रात्री घडली. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी सचिन सदाशिव देशमुख (वय ४७ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आगरकरवाडी रोड परिसरात घडली. आरोपी सचिन देशमुख हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला असताना घरगुती वादावरून मुलींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा एका मुलीने “शिवीगाळ करू नका” असे म्हटले, तेव्हा आरोपी वडिलांचा पारा चढला आणि त्यांनी दोघींना मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांच्या मारहाणीसोबतच वडिलांनी २१ वर्षाच्या एका मुलीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ, तर दुसऱ्या २४ वर्षीय मुलीच्या हाताच्या पंजावर आणि पायाच्या पोटरीवर दाताने जोरात चावा घेतला व त्यांना जखमी केले. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Vedh News