पुण्यात खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुण्यात खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
Share

पुणे – खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि वाढीव व्याजाच्या रकमेसाठी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडगावशेरी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वींद्र सुभाष असलकर (रा. साईनाथ नगर, वडगावशेरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत महेश सुभाष असलकर (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरेश रामकृष्ण जायभाये (रा. बकोरी रस्ता, वाघोली), अमित रघुनाथ सातव (रा. आव्हाळवाडी), शिरीष प्रभाकर गायकवाड (रा. विश्रांतवाडी), मंजिरी अमित कुलकर्णी (रा. प्रभात रस्ता) आणि आव्हाळे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ रवींद्र असलकर यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. मुद्दल व व्याजाची परतफेड न झाल्याने आरोपींनी रवींद्र यांना वारंवार शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून रवींद्र यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर चंदननगर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला.

Vedh News