‘हम किसी को छेडते नही…और अगर…’ रोहिणी खडसे यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

‘हम किसी को छेडते नही…और अगर…’ रोहिणी खडसे यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ) 
Share

पुणे – पुण्यात गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. MPSC आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. अनेक नेतेमंडळींनी आंदोलन स्थळी येऊन आपला पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहत भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

आंदोलनस्थळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या होत्या की, “ त्या काळ्या कुट्ट नकली भुवया घेऊन घेऊन, रेकॉर्ड करून विचित्रताई येते, आणि नंतर सांगते की हे जे आंदोलन चाललंय हे आंदोलन नौटंकी आहे, अगं बाई तू ये, इथे ये जेव्हा तू, महिला आहेत आपण चांगलंच बोलूयात, आदराने बोलूयात पण काय माहितीय का? आदरणीय ताईंना पायाला ५६ बांधून फिरायची सवय त्याच्यामुळे त्यांना आपल्या आंदोलनकर्त्यांची तळमळ, आपलं जो जीव जळतोय ना, जेव्हा पेपर फुटतो,आपल्या आई वडिलांनी आपल्याला अर्धी भाकरी खाऊन जे मोठं करत परीक्षेमध्ये आपण पास जी आशा असते ना आपल्या आई वडिलांची ती आशा नाही कळणार यांना” अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती.

त्यावर आता सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी पोस्ट करत म्हटलं की, “खरं तर कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं आम्हाला आवडत नाही, पण जेव्हा रोहिणी खडसे राजकीय टीकेच्या सर्व पातळ्या ओलांडतात, तेव्हा त्यांना आरसा दाखवावाच लागतो! MPSC च्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्या महिलेवर खालच्या पातळीत बोलण्यापेक्षा, रेव पार्टीत नाव आलेल्या पतीच्या प्रकरणांवर उत्तर द्या!आमचा नियम स्पष्ट आहे, “हम किसी को छेडते नही… और अगर किसीने छेडा, तो छोडते नही!”

काय म्हणाल्या चित्रा वाघ हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://x.com/ChitraKWagh/status/2107694708982190237

 

Vedh News