बुलढाण्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रक्तरंजित थरार ; दोघांचा मृत्यू

बुलढाण्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रक्तरंजित थरार ; दोघांचा मृत्यू
Share

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान आणि रक्तरंजित हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा परिसरात एका कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये त्यात बसण्याच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. या दोन गटामध्ये आधी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली, बाचाबाचीचे रुपांतर प्राणघातक हाणामारीमध्ये झाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते हातात तलवारी, शस्त्र घेऊन एकमेकांना भिडले.

या रक्तरंजित हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये  शिवसेना शिंदे गटाचे अनवर शेख तर  अजित पवार गटाचे कार्यकर्ता आरिफ शेख यांचा समावेश आहे. तसेच सात जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Vedh News