पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ; म्हणाले..’महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या नोकरीसाठी मी….’

पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ; म्हणाले..’महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या नोकरीसाठी मी….’
Share

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी जात पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधला. ‘महाराष्ट्राच्या मुला-मुलींना नोकरी मिळावी यासाठी कुणाचेही पाय धरावे लागले तर राज ठाकरे पाय धरायला तयार आहे’ असे विधान करून आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. 

राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातल्या नोकऱ्या, महाराष्ट्रातले कामधंदे, माझ्या मराठी मुला-मुलींना मिळायला पाहिजेत. आरक्षण पाहिजे, आरक्षण मिळाल्यावर सरकारी नोकरी आहे कुठे? केंद्र सरकारचं हेच धोरण आहे जे दिसल ते अदानीला देतात. सरकारने तुम्हाला गृहीत धरलं आहे. निवडणुका येतात त्यावेळी पैसे फेकतात. दारू दिली जाते आणि लोक वाहत जातात आणि निवडून येतात”

“मी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलो आहे. ज्या ज्या मार्गाने होईल त्या त्या मार्गाने तुमचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुला-मुलींना नोकरी मिळण्यासाठी कुणाचेही पाय धरायला लागले तर राज ठाकरे ते पाय धरायला तयार आहे. परिस्थिती आणि वस्तुस्थिती समजून घ्या आणि मगच पुढचं आंदोलन सुरू ठेवा. लोक येतील, भाषण करतील, नवी उमेद दाखवतील. पण परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. दबाव काय असतो हे सरकारला कळलं पाहिजे, असा दबाव निर्माण करा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. तसेच “हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा बाळगतो”, असंदेखील ते म्हणाले.

Vedh News