भरधाव मोटारीच्या धडकेत 75 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू; चालक महिलेवर गुन्हा

भरधाव मोटारीच्या धडकेत 75 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू; चालक महिलेवर गुन्हा
Share

पुणे- कात्रज ते नवले पूल बाह्यवळण महामार्गावर भरधाव मोटारीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात गुरुवारी अभिनव महाविद्यालयासमोर घडला.

मृत व्यक्तीचे नाव संभाजी गोविंद साळुंखे, वय 75, रा. आंबेगाव पठार, असे आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलाने, उमेश साळुंखे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

मोटार चालक दीप्ती नंदकुमार दखने वय 45, रा. आंबेगाव खुर्द, यांच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संभाजी साळुंखे सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडले होते. अभिनव महाविद्यालयासमोरील महामार्ग ओलांडत असताना कारने त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे.

या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आंबेगाव पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Vedh News