आळंदी:(वेध न्यूज ) जुलै महिन्यात इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामध्ये भक्ती सोपान पुला वरील लोखंडी संरक्षण कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरचे कठडे अजूनही अर्धवट पडलेल्या अवस्थेत पुलावर आणि नदी पात्रात आहे .
कार्तिकी यात्रेला कमी कालावधी राहिला असल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कठड्याचे काम प्रशासनाच्या वतीने तात्काळ करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कार्तिकी यात्रेलाअवघा एक महिन्या पेक्षा कमी कालावधी उरलेला आहे.कार्तिकी यात्रे निमित्त लाखो भाविक भक्त आळंदी मध्ये दाखल होतात. यात्रे निमित्त आलेल्या वारकरी भाविकां करिता दर्शनबारीची सुविधा नदीपलीकडील जागेत वैतागेश्वर मंदिरा शेजारील जागेत केली जाते.तेथून ती दर्शन बारीची रांग भक्ती सोपान पुलावरून मंदिराकडे जाते.यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये तसेच भाविकांच्या सुरक्षेतेसाठी त्या पुलावर लोखंडी संरक्षण कठडे (रेलिंग) बसवणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे पुरा मुळे स्काय वॉक वरील फरश्या निघालेल्या असून त्या ठिकाणची देखील योग्य ती दुरुस्ती लवकर करण्यात यावी असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे .

