पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ लागू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण ११ हजार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) पूर्ण झाले आहे. रिक्षाचालकांच्या सोयीसाठी पुणे आरटीओने मीटर तपासणी केंद्रांच्या संख्येत वाढ केली असून, मंगळवारपासून (ता. २२) नवीन केंद्रे कार्यान्वित होत आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने तीन ऑगस्टच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार, एक सप्टेंबर २०२६ पासून सुधारित भाडेवाढ लागू झाली आहे. यानंतर मीटर तपासणी अनिवार्य असल्याने आरटीओने शिवाजीनगर व रामटेकडी येथे दोन नवीन केंद्रे सुरू केली आहेत. पुण्यात आतापर्यंत आठ हजार, तर पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजार रिक्षांचे प्रमाणीकरण झाले आहे. दीड लाख रिक्षांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
मीटर प्रमाणीकरण करण्याचे स्थळ
अलंकार पोलीस ठाण्यासमोर, कर्वेनगर
इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर, खराडी
सिंचननगर, रेंजहिल्स कॉर्नर, शिवाजीनगर
रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन क्रमांक ३, रामटेकडी
वेळ
सोमवार ते शुक्रवार- सकाळी ८ ते १०
शनिवार- सकाळी ८ ते दुपारी ४
दर रविवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी मीटर तपासणीचे कामकाज बंद.
