पुणे – सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर महेश मोटे यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य मागे घेत मनसेच्या पुणे येथील कार्यालयात जाऊन स्वत:च्या तोंडाला काळे फासत माफी मागितली आहे.
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर महेश मोटे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते संतापले होते. त्यानंतर अखेर मनसेच्या पुणे येथील कार्यालयात जाऊन महेश मोटे यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य मागे घेत स्वत:च्या तोंडाला काळे फासत उठा बशा काढत आणि राज ठाकरे यांच्या फोटोसमोर दंडवत घालून सपशेल माफी मागितली आहे.
महेश मोटे याने काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. आपण राज ठाकरे यांच्याबद्दल बोललो होतो की फार मोठी चूक होती. रिल्सच्या नादात मी सगळे हे केले. त्या चुकीबद्दल मी त्यांची माफी मागत आहे असे महेश मोटे याने म्हटले आहे. शुभम दादा असतील मनसेचे लोक असतील त्या सर्वांची आपण माफी मागतो असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. कोणाच्या नादी लागा पण यांच्या नादाला लागू नका असेही महेश मोटे यानी म्हटले आहे.
या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात महेश मोटे याच्या तोंडाला काळे फासलेले दिसत आहे. महेश मोटे स्वत:ची चप्पल डोक्यावर ठेवून उठा बशा काढताना या व्हिडीओत दिसत आहे. तसेच त्याने यावेळी मनसेच्या शाखेत जाऊन राज ठाकरे यांच्या फोटो समोर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली आहे. माझ्या सारख्या माणसाने उठायचे आणि काही बोलायचे हे बरोबर नाही. मी मनसेचे माफी मागतो असेही रिल्स स्टार महेश मोटे यांनी म्हटले आहे.
महेश मोटे हे रिल स्टार असून त्यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये करुन आपले फॉलोअर वाढवले होते.
माफी मागताना महेश मोटे काय म्हणाले हे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DdgoiZmt7_6/?stkn=dXp0Ym1neXcxbHU0
