ब्रेकिंग न्यूज

साडेसाेळा लाख मतदार ठरविणार पिंपरी चिंचवड शहरातील तीन आमदार

Share

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. 22) प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी खर्‍या अर्थाने सुरू झाली आहे. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघात 16 लाख 44 हजार 119 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार 8 लाख 71 हजार 940 तर महिला मतदार 7 लाख 72 हजार 63 आहेत. 188 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद झाली आहे. हे मतदार शहरातील तीन आमदार ठरविणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 29 ऑक्टोबर आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवार (दि.15) पासून लागू झाली आहे. निवडणुकीची अधिसूचना आज (दि. 22) जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 29 ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नाेव्हेंबरपर्यंत आहे. 20 नाेव्हेंबर रोजी मतदान असून 23 नाेव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

‘असा’ आहे निवडणूक कार्यक्रम

१) निवडणुकीची अधिसूचना – 22 ऑक्टोबर
२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस – 29 ऑक्टोबर
३) उमेदवारी अर्जांची छाननी – 30 ऑक्टोबर
४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – 4 नाेव्हेंबर
५) मतदान – 20 नाेव्हेंबर