पुणे- संपूर्ण देशात जगलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना येरवडा कारागृहात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील दोन संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना येरवडा तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप केतनच्या कुटुंबीय आणि मित्रांनी येरवडा तुरुंग प्रशासनावर केला आहे. कुटुंबाचा आरोप आहे की सिया गोयलला येरवडा महिला तुरुंगात अनेक खास सुविधा दिल्या जात आहेत. तिला VIP वागणूक दिली जात आहे.
केतनच्या कुटुंबाचा आरोप आहे की, येरवडा महिला तुरुंगात सिया गोयलला नियमबाह्य जाऊन अनेक खास सुविधा दिल्या जात आहेत. तिला सर्वसामान्य कैद्यांपेक्षा वेगळी आणि VIP सारखी वागणूक मिळत आहे. हाच आरोप चेतन चौधरीच्या बाबतीतही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘गुलाबो गँग’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ यांनी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आणि आरोपी सिया गोयलच्या घरासमोर दोन दिवस आंदोलन केले. आंदोलकांनी मागणी केली आहे की, तुरुंगात दिल्या जाणाऱ्या सर्व अवैध सवलती ताबडतोब बंद कराव्यात. “ही लढाई फक्त आमच्या केतनसाठी नाही, तर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक कायम राहावा यासाठी आम्ही लढत आहोत.” केतनच्या कुटुंबाने एका निवेदनात म्हटले आहे.
