पुणे- खासगी वाहनावर विनापरवाना पोलीस किंवा पोलिसांचा लोगो लावून फिरणे वाहनचालकांना महागात पडले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी २३ वाहनचालकांवर कारवाई करून ११ हजार ५०० रुपये वसूल दंड वसूल केला आहे.
खासगी वाहनावर विनापरवाना पोलीस किंवा पोलिसांचा लोगो लावणे कायद्याने गुन्हा असूनही अनेकजण आपल्या वाहनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स, बोर्ड लावून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतात.तसेच अशी वाहने गुन्ह्यासाठी वापरली शकतात त्यामुळे पोलीस विभागाचे अधिकृत बोधचिन्ह, पोलीस हे नाव फक्त पोलिसांची अधिकृत वाहने, किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी असलेल्या वाहनांनाच वापरण्याची परवानगी आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात २३ वाहनचालकांकडून ११ हजार ५०० रुपये वसूल दंड वसूल केला आहे.
