राजगुरूनगर – राजगुरूनगर जवळील थिगळस्थळ येथे एका १८ वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हर्ष हिरामण मांजरे (वय १८, रा. पांडुरंगनगर, थिगळस्थळ, राजगुरूनगर, मूळ रा. मांजरेवाडी पिंपळ, ता. खेड) असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष रात्री सव्वानऊच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही म्हणून घरच्या लोकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी जगन्नाथ थिगळे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा त्याचा मृतदेह विहिरीत आढळला.
हर्षने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण करून अवसरी (ता. आंबेगाव) येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
