पुणे – सिंहगड रोड परिसरात एका घरात देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २ इसमांना अटक केली. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने सोमवारी (दि. १७)मध्यरात्री २ वाजता केली.
अभिषेककुमार सुरजन बिन, (वय 20 वर्षे, रा. साई नगर हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे), आदित्य राजू शिंदे, (रा. गल्ली नं. 50, शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत, पुणे),
त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ४,२८,५३९/- रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल आणि २ वाहने जप्त केली आहेत.
गुन्हे शाखा युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण अत्रावणे, सहा. पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या पथकाला सिंहगड रोड, साईनगर हिंगणे खुर्द येथे अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने तातडीने त्या पत्त्यावर छापा टाकला. यावेळी घरातून दारू विक्री करताना एका इसमाला ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त श्रीमती तेजस्विनी सातपुते, सह. पोलीस आयुक्त श्री. गगनर हसन, अपर पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
