ब्रेकिंग न्यूज

पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तळेगावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोन जखमी 

Share

शिरवळ -सातारा-पुणे रस्त्यावर शिरवळजवळ भरधाव कार डिवायडरला धडकून उलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ हॉटेल शिवालयसमोर ११ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

वेदांत अर्जुन वारिंगे (रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (रा. कामशेत, मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (रा. टाकवे, मावळ) आणि निखिल बाळू राऊत (रा. कामशेत, मावळ) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

दीक्षित दयानंद पुजारी आणि कारचालक मयूर हनुमंत शिंदे (दोघेही रा. कामशेत, मावळ) यांच्यावर शिरवळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

असा झाला अपघात

पुण्याहून सातारामार्गे महाबळेश्वरकडे निघालेल्या भरधाव कारवरील (टाटा नेक्सॉन) चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला.अनियंत्रित झालेली कार दुभाजकाला (डिव्हायडर) धडकून पलटी झाली आणि नंतर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली.

सारोळा महामार्ग पोलीस व शिरवळ पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून कारचालकाविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.