ब्रेकिंग न्यूज

‘मुळशी पॅटर्न’च्या नावाने पुन्हा मुळशीची बदनामी नको; मुळशीकर आक्रमक

Share

 

पुणे -‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामुळे मुळशी तालुक्याची गुन्हेगारी अशी चुकीची ओळख निर्माण झाली असून, त्याचे दूरगामी परिणाम आजही मुळशीकरांना भोगावे लागत असल्याची भावना मुळशीकरांकडून व्यक्त होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विवाहाच्या बाबतीतही मुळशीकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुळशी हा वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि कुस्तीगिरांचा तालुका आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ ही गुन्हेगारीची ओळख पुसून मुळशीची खरी ओळख महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आता मुळशीकरांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुन्हा ‘मुळशी पॅटर्न २’ या नावाने नवा चित्रपट येत असल्याचे पाहून मुळशी तालुक्याची पुन्हा बदनामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. याविरोधात मुळशीकरांना एकत्र करून जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू असून, लवकरच बैठका घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुळशी पॅटर्न ही गुन्हेगारीची नव्हे, तर वारकरी, शेतकरी आणि कुस्तीगिरांची ओळख आहे, हे ठासून सांगण्याची वेळ आली असल्याचे मुळशीकरांचे म्हणणे आहे.

या विषयाबाबत मुळशी पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे यांनी मांडलेली भूमिका समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://www.facebook.com/share/v/1L4AZccdLq/