ब्रेकिंग न्यूज

अभिजीत दिपकेंनी ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची माफी मागावी, अन्यथा…

Share

बीड- नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी दिपके यांनी सध्या वेशातील एका पोलीस निरीक्षकाला घराबाहेर काढले होते. दिपकेंनी या पोलीस अधिकाऱ्याला सगळ्यांसमोर झापले होते. या प्रकाराचा बीड मधील पोलीस बॉईज संघटनेनं निषेध केला आहे. दिपकेंनी संबंधित पीआयची पाय धरून माफी मागावी अशी मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानाच्या बाहेर एक पोलीस अधिकारी साध्या वेशामध्ये भेटण्यासाठी गेला होता. यावेळी तुमचे नाव काय ? तुमचे पद काय अशी विचारणा करून त्या अधिकाऱ्याला घराबाहेर काढले होते. त्यावरून पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून अभिजीत दिपके यांनी त्या पोलिस पोलीस अधिकाऱ्याची पाय धरून माफी मागावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा पोलीस बॉईज संघटनेनं दिला आहे.

तसेच आपले कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने अवमानित करणे चुकीचे आहे. या प्रश्नावर आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांचे पोलीस संरक्षण काढण्याची देखील मागणी करणार असल्याचे पोलीस बॉईज संघटनेचं अध्यक्ष राहुल दुबाले यांनी म्हटले आहे.