मुंबई- महागडे स्मार्टफोन बऱ्याचदा एकरकमी पैसे न देता हप्त्यावर घेतला जातो. त्यामुळे हप्त्यावर मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
EMI चा हप्ता थकल्यानंतर काही वित्तीय संस्था ग्राहकांचा मोबाईल रिमोट लॉक करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. यामुळे फोनचा वापरच बंद होत असल्याने काम, संवाद आणि आपत्कालीन सेवांवरही परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 1 जानेवारी 2027 पासून मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप EMI वर घेणाऱ्या ग्राहकांसाठी नवे नियम लागू होणार आहेत. या नियमांमुळे बँका आणि वित्तीय संस्थांना ‘रिमोट लॉक’ तंत्रज्ञान वापरता येईल मात्र त्यासाठी कठोर नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
मोबाईलचा एक EMI चुकला म्हणून फोन लगेच लॉक करता येणार नाही असे RBI ने स्पष्ट केले आहे. कर्जाचे खाते किमान 30 दिवस थकीत झाल्यानंतरच फोनवर काही मर्यादेपर्यंत रेस्ट्रिक्ट करता येईल. तसेच पूर्ण फोन लॉक करण्यासाठी EMI किमान 60 दिवसांचा विलंब झालेला असणे आवश्यक आहे. म्हणजेच ग्राहकाला हप्ता भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
फोन लॉक कधी होऊ शकतो ?
मोबाईलचा एक EMI चुकला म्हणून फोन लगेच लॉक करता येणार नाही असे RBI ने स्पष्ट केले आहे. कर्जाचे खाते किमान 30 दिवस थकीत झाल्यानंतरच फोनवर काही मर्यादेपर्यंत रेस्ट्रिक्ट करता येईल. तसेच पूर्ण फोन लॉक करण्यासाठी EMI किमान 60 दिवसांचा विलंब झालेला असणे आवश्यक आहे. म्हणजेच ग्राहकाला हप्ता भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. RBI च्या नियमांनुसार, रिमोट लॉकची सुविधा फक्त त्या मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवरच लागू होईल, ज्यासाठी थेट कर्ज घेतले आहे. मात्र वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज किंवा गृह कर्जासाठी तुमचा आधीचा मोबाईल लॉक करता येणार नाही. EMI थकल्यानंतर फोन लॉक करण्यापूर्वी ग्राहकाला आधी सूचना द्यावी लागणार असून, कर्ज मंजूर करतानाच रिमोट लॉकची अट स्पष्ट सांगावी लागेल. तसेच फोन लॉक करण्यापूर्वी स्वतंत्र नोटीस देऊन थकबाकी भरण्याची संधी द्यावी लागणार आहे.
फोनवर निर्बंध आले तरी काही सेवा बंद करता येणार नाहीत. यामध्ये इनकमिंग कॉल, एसएमएस सेवा, SOS किंवा आपत्कालीन सुविधा, नोकरी किंवा व्यवसायासाठी आवश्यक असलेली मूलभूत सेवा आदी गोष्टींचा समावेश असेल. यामुळे हप्ता जरी थकला तरी ग्राहकाचा संपर्क जगापासून पूर्णपणे तुटणार नाही.
फोन लॉक करण्याच्या नावाखाली बँका किंवा वित्तीय संस्था ग्राहकाच्या खासगी माहितीमध्ये डोकावू शकणार नसून यावर RBI ने कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो, व्हिडिओ, SMS, कॉल हिस्ट्री, लोकेशन हिस्ट्री तसेच इतर कोणताही वैयक्तिक डेटा पाहण्यास RBI ने बंदी घातली आहे. यामुळे ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण होणार आहे.
