ब्रेकिंग न्यूज

सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यशस्वी 

Share

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नाराजी नाट्य रंगले होते. संजय काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यांना यश आले आहे.

पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे नाराज झाले होते. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा डमी अर्ज असल्याचे बोलले जात होते. दुसरीकडे भाजपच्या प्रदीप कंद यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केला. महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी समोर होते. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे खुद्द राष्ट्रवादीतच पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. विक्रम काकडे हे संजय काकडे यांचे चिरंजीव आणि माजी आमदार अनिल भोसले यांचे जावई आहेत.

अखेर सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यांना यश आले आहे. विक्रम काकडे, सुनील टिंगरे आणि पार्थ पवार यांची जिजाई निवासस्थानी एकत्रित चर्चा झाली. या बैठकीत राष्ट्रवादीत असलेल्या नाराजीवर अखेर पडदा पडला आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे म्हणाले की, पक्षाने जो निर्णय घेतला आहे. तो सगळ्यांनी मान्य केला आहे. पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षात असे काही निर्णय घ्यावे लागतात. संजय काकडे यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांना अधिकार आहे पक्ष कार्यालयात यायचा, मला कोणाचाही फोन आलेला नाही. मी दादांचा कार्यकर्ता आहे मी शब्द पाळतो. पुढील काळात योग्य तो सन्मान राखला जाईल असं मला सांगितलं असल्याचं सुनील टिंगरे म्हणाले.