पिंपरी -पिंपरी चिंचवड शाखेतर्फे डॉक्टरांसाठीची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा डी वाय पाटील फार्मसी कॉलेज आकुर्डी येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल कौन्सिल फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन – अतिथी NCISM, दिल्ली चे पदाधिकारी डॉक्टर नारायण जाधव, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन MCIM चे रजिस्टर डॉक्टर दिलीप वांगे सर, निमा केंद्रीय शाखा दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी हेउपस्थित होते.
निमा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर राजू ताटेवार, सचिव डॉक्टर प्रशांत देशमुख, कोषाध्यक्ष डॉक्टर सोपान खर्चे, डॉक्टर राजेश उताणे, डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, डॉक्टर गिरीश डागा, डॉक्टर दिलीप मोहिते, निमा वुमन्स फोरम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर अमिता कुकडे सचिव डॉक्टर प्रज्ञा खोसे उपस्थित होते.
कार्यशाळा ही मुख्यतः पाठीचा मनका व त्यासंबंधीचे आजार यावर आधारित होती. पाठीच्या मनका उपचाराची आयुर्वेदिक उपचार पद्धती, गुंतागुंतीचे मणक्यांचे विकार जे कुठल्याही शस्त्रक्रियेने नीट होऊ शकत नाही ते आयुर्वेदिक पद्धतीने कसे यशस्वीपणे उपचार होऊ शकतो यावर आयुर्वेदिक निष्णात तज्ञ डॉक्टर मंगेश देशपांडे, डॉक्टर रामदास आव्हाड डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी आपली विचार मांडले उपचार पद्धती समजावून सांगितले.
नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन चे सदस्य व मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड चे अध्यक्ष डॉक्टर नारायण जाधव यांनी आयुर्वेद पदवीधरांचे हक्क, मर्यादा, उपचार पद्धती व आयुर्वेद तील नवनवीन संशोधन व जागतिक स्तरावरील मान्यता ह्यावर छान विवेचन केले.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश रंजन व डॉक्टर भूषण मिसाळ यांनी कोमाच्या रुग्णांना उपचारासाठीची नवीन पद्धती – Deep Brain Stimulation – जी पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच उपलब्ध झाली आहे यावर सविस्तर माहिती दिली. तसेच डॉक्टर पंकज टोटला ह्यांनी मणक्याच्या विकारांवर दुर्बिणींनी यशस्वी शस्त्रक्रिया ह्यावर उपस्थित डॉक्टरांना माहिती सादर केली.

कार्यशाळेस पिंपरी चिंचवड तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पाचशे डॉक्टर उपस्थित होते.कार्यशाळेचे आयोजन निमा पिंपरी चिंचवड शाखेने केले होते. उपस्थित डॉक्टरांना या कार्यशाळेद्वारे त्यांच्या नोंदणी नूतनीकरण साठीचे आवश्यक दहा क्रेडिट पॉईंट ही देण्यात येणार आहें.
कार्यशाळेचे आयोजन निमा पिंपरी -चिंचवडचे पदाधिकारी अध्यक्ष डॉक्टर प्रताप सोमवंशी, सचिव डॉक्टर रमेश केदार, कोषाध्यक्ष डॉक्टर सुनील भोये, निमा राष्ट्रीय आयुर्वेदिक फोरमचे अध्यक्ष डॉक्टर निलेश लोंढे, डॉक्टर सत्यजित पाटील, सारिका लोंढे, डॉक्टर वैभव लाडे, डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर संतोष भांडवलकर, डॉक्टर ज्योती शिरसागर डॉक्टर अमृत पेरणे, निमा वुमन फोरम डॉक्टर हेमा चंद्रशेखर, डॉक्टर मयुरी मोरे, डॉक्टर प्रशांत बंब, डॉक्टर प्रसाद काटे यांनी केले.
