भोसरी -त्रिपुरारी पौर्णिमेनिमित मोशी प्राधिकरण मधील संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व एम आय डीसी भोसरी पोलीस स्टेशन, परिसरातील पर्यावरण प्रेमी यांच्या सहकार्याने एक दीप पर्यावरणासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला .
एम आय डीसी भोसरी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे पर्यावरणाचा संदेश देत भुषण खंदारे याने रांगोळ्या काढून तसेच हजारो दिवे लावून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदारसाहेब यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन दिपोत्सवला सुरुवात केली यावेळी त्यांचे सर्वच सहकारी स्टाफ व इतर मान्यवर हजर होते.
भूगोल फाउंडेशन व संतनगर मित्र मंडळाचे चे अध्यक्ष विठ्ठलनाना वाळुंज,मारुती गायकवाड,अनिल जगताप व कामगार नेते हनुमंत लांडगे यांनी सर्वांचे स्वागत करून मंडळ पर्यावरण व वृक्षारोपण, गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन,वसुंधरा वाचवा विषयी करत असलेल्या कामाची माहिती व महत्व सांगितले.यावेळी सर्वांना आवाहन करण्यात आले की येथून आपण सर्वजण संकल्प करा की *एक दिप पर्यावरणासाठी* हा मंत्र घेऊन पर्यावरणासाठी काम करणार,वृक्षरोपण संवर्धन करणार,प्लॅस्टिकचा वापर करणार नाही आणि वसुंधरेला हानी होईल असे काही करणार नाही, करु देणार नाही. या वेळी बोलताना मान्यवरांनी पण पर्यावरण व वृक्षारोपण चे महत्व सांगितले. तसेच सर्वांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल कौतुक करून पर्यावरणासाठी व वृक्षारोपण करण्यासाठी स्वतः सहभागी होऊन योग्य ती मदत केली जाईल असे सांगितले.यावेळी मान्यवरांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, संत साई स्कुलचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर सर,योगेश लोंढे, पुणे जिल्हा मेडिकल असोसिएशनचे संतोष वरे,इंद्रायणी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल वीर जेजुरी खंडेराय देवस्थानचे माजी विश्वस्त तुषार सहाणे व प्रमुख विश्वस्त अनिल सै्ांदडे,भाजप मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे ,नारायण हट स्कुलचे अंकुश गोरडे,प्रिती स्कुल मोशी संस्थापक विठ्ठल मिसाळ,पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष इंगळे, श्री अशोक पवार श्री रुपेश खडसे ,पोलीस हवालदार संतोष फावडे यांनीही उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी संतनगर, इंद्रायणीनगर परीसरातील मंडळाचे उपाध्यक्ष मारुती गायकवाड, उद्योजक नवनाथ कोलतेपाटील, अनिल जगताप,राजेश किबिले, भास्कर दातीर,जयसिंग कोहीनकर , साहेबराव गावडे,शिवराम काळे, शशिकांत वाडते,भारत सरडे,अनिल घाडगे,मनोज माकोडे,उद्योजक नेताजी पाटील,विकास सावंत,अजय म्हस्के,संजय मरगळे, संतोष पाटील, नागेश शेळके,विलास मोरे,मच्छिंद्र बुर्डे,अनिल रासकर, अजिंक्य पोटे, अशोक वाडेकर, अशोक पोटे, यादवराव जाधव ,संजय रसाळ,पर्यावरण मित्र अण्णा मटाले,रोटरीचे अध्यक्ष दिपक सोनवणे, निकुंज रेंगे,सुहास चव्हाण, रमेश जाधव,अशोक यादव,नंदकुमार ताकवले, पोलीस हवालदार संदीप मांडवी,महिला पोलीस हवालदार सुप्रिया चव्हाण,महिला पोलीस हवालदार गायकवाड मॅडम,पोलीस हवालदार जाधव,पोलीस शिपाई तानाजी सोनवणे, पोलीस शिपाई तानाजी बनसोडे, पोलीस शिपाई वानखेडे,असे अनेक सहकारी हजर होते. तसेच भूगोल फाउंडेशनच्या महिला आघाडीच्या शोभा फटांगडे , ज्योती दरंदले , गवळीनगर पतसंस्थेच्या संचालिका आशा वाळुंज,संगिता इचके,स्नेहा गायकवाड, मुख्याध्यापिका संध्या वाळुंज, अनघा मडावी, ज्योत्स्ना हुलावळे,विजया बुर्डे, सेजल वाळुंज, वाडेकरताई, अपुर्वा वाळुंज तसेच मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
