पिंपरी -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आपल्याला विधान परिषद मिळाल्यामुळे आमच्या उमेदवारांचा पिंपरी विधानसभेच्या विजयाचा मार्ग हा सुखकर झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान आमदार अमित गोरखे यांची पिंपरी विधानसभेच्या 398 बुथ वरती पकड आहे. तसेच पिंपरी विधानसभेमधील सर्वच प्रभागांमध्ये असणारा दांडगा जनसंपर्क हा महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना विजयी करण्यासाठी उपयोगात आणावा. असे मत या भेटीदरम्यान पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी मधील सध्याची परिस्थिती त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काय करायला हवे याविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे अमित गोरखे यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान भाजपाचे राजेश पिल्ले ,अजित भालेराव, देवदत्त लांडे ,पंकज दलाल ,शाकीर भाई शेख,बादशाह इटकर , धरंम वाघमारे,धर्मेंद्र क्षीरसागर, गणेश लंगोटे जयेश चौधरी, राजू होसमणी आदी पदाधिकारी उपस्थित होते..

