ब्रेकिंग न्यूज

परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा संपन्न

Share

आळंदी:-  परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा आळंदी येथील रसिकलाल धारिवाल ,फ्रुटवाले धर्मशाळेत आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कौंटूंबिक स्नेह मेळाव्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले तुमचं माझं नात मातीचे आहेच पण संघर्षाचे सुद्धा तुमचं माझं नाते आहे.माझा माझ्या कुटुंबाला कुटूंबात तसा आपल्या सुद्धा अनेकदा क्षणाक्षणाला याठिकाणी संघर्ष करावा लागला.

तसेच ते म्हणाले कुटूंबात 12 वर्षाचा प्रारब्ध भोगावा लागला.हा प्रारब्ध आहे. तुमची प्रामाणिक भावना होती आम्ही
(मुंडे कुटूंबीय) एक यावे. याविषयी त्यांनी मनोगतातुन माहिती दिली.

तसेच ते पुढे म्हणाले तुम्ही आपल्या मातीच अस्तित्व या पवित्र मातीत स्वतः टिकवले आहे .येथे येऊन,तुमच्या सुद्धा किती मोठी ताकद आहे पहा.ही ताकद अशीच कायम राहिली पाहिजे.

लाडकी बहीण योजना ,शेतकरी कृषी वीज बिल इतर योजना याबाबत त्यांनी माहिती दिली.

तसेच धनंजय मुंडे यांनी यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.पुष्पहार व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.