ब्रेकिंग न्यूज

महापालिका भांडार विभागातील फर्निचर ची निविदा रद्द करावी : राहुल कोल्हटकर

Share

पिंपरी (वेध न्यूज )  :-   पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभागामार्फत शहरातील शाळांसाठी बाक तसेच टेबल खुर्ची खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे.ही निविदा ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आली आहे ती तातडीने रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोलटकर यांनी केली आहे.

या संदर्भात कोल्हटकर यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची बाक तसे शाळेतील फर्निचर खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.निविदा शिक्षण विभागातील कार्यरत असणाऱ्या दोन ठेकेदार यांना लाभ मिळावा या हेतूने त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे उपलब्ध असणारे प्रमाणपत्र कागदपत्रानुसार करण्यात आली आहे.

शॉप ऍक्ट मध्ये फर्निचरचा उल्लेख असावा. निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली नाही. करोना काळात टेबल खुर्ची टेंडर प्रक्रियेत निकृष्ट दर्जाचे तसेच अयोग्य वस्तू पुरवठा करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा काम देण्यासाठी खटाटोप सुरू आहे. निविदा अटी शर्ती ठेकेदार याच्या पद्धतीने तयार केल्या आहेत. संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन योग्य आणि सर्वसमावेशक अटी शर्ती टाकून निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी कोल्हटकर यांनी केली आहे.