आळंदी:- श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आज दि.29 रोजी दिवाळी पहाट संगीत महोत्सव-2024 या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.हा कार्यक्रम दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर वेळ – सकाळी 6 वा. स्थळ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे होत आहे.
आज मंगळवार – धनत्रयोदशी दि.29 ऑक्टोबर रोजी सायली तळवलकर यांची सुमधुर गायन सेवा संपन्न झाली.साथसंगत: कल्याण पांडे – तबला , तुषार केळकर -संवादिनी ,रोहित खवळे – पखवाज वादक यांची लाभली.बुधवार – शिवरात्री दि.30 ऑक्टोबर ताल मंथनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पखवाजः- सुहास गवळी, रोहित खवळे तबलाः- सौहम गोराणे, तुकाराम जाधव लहरा साथ: आकाश नाईक यांची असणार आहे.
गुरुवार – नरक चतुर्दशी दि. 31 ऑक्टोबर रोजी शरयू दाते यांची गायन सेवा होणार असून ,
साथसंगत :सोहम गोराणे – तबला , यश खडके संवादिनी ,अविनाश पवार – पखवाज विश्वास कळमकर यांचे असणार आहे.
शुक्रवार – लक्ष्मीपूजन दि.1 नोव्हेंबर रोजी गायन सेवा – भरत बलवल्ली यांची होणार असून,साथसंगत: प्रसाद करंबेळकर – तबला , मकरंद कुंडले संवादिनी, दादा परब पखवाज , डॉ. श्री. घनश्याम बोरकर – निरुपण लाभणार आहे.
शनिवार – बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा
2 नोव्हेंबर रोजी गायन सेवा – मंजुषा पाटील,साथसंगत: रोहित मुजुमदार – तबला , सुयोग कुंडलकर – संवादिनी , सुजित लोहार – पखवाज , आनंद टाकळकर – टाळ वादक यांची लाभणार आहे.
रविवार – भाऊबीज दि.3 नोव्हेंबर रोजी गायन सेवा – कृष्णा बोंगाणे यांची होणार असून,साथसंगत तेजोवृष जोशी – तबला , यश खडके संवादिनी, निळोबा गोरठाणकर – पखवाज , विश्वास कळमकर-टाळ , वैभव कडू – गायन साथ यांची लाभणार आहे.

