ब्रेकिंग न्यूज

पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

Share

मोशी- माझी वसुंधरा माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व भूगोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच वसुंधरा हिरवीगार दिसण्यासाठी विविध प्रकारची देशी,आर्युवेदिक वृक्षांचे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह सेक्टर-३ व भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र ( डिस्ट्रीक्ट सर्कल) सी लिंक जंगल गार्डन सेक्टर-७ याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील, भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, शासकीय आदिवासी वसतिगृहाचे अधिकारी कर्मचारी, मुली आणि भूगोल फाउंडेशनचे सदस्य,जंगल गार्डन ग्रुप,संतनगर मित्र मंडळ,इंद्रायणी सेवा संघ , लायन्स क्लब अॅाफ पिंपरी-चिंचवड स्टार्स,वृक्ष व संवर्धन विभाग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या संस्थानी सहभाग घेतला.

यावेळी सेक्टर ३ मधील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या गृहपाल शितल वकारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील, उद्योजक नवनाथ कोलते या मान्यवरांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करुन करत असलेल्या कामाचे कै्ातुक केले.याप्रसंगी बोलताना पर्यावरण अभ्यासक श्री विठ्ठल नाना वाळुंज यांनी जागतिक तापमान हा गंभीर प्रश्न असुन त्याला रोखणे वैश्विक जबाबदारी आहे.त्याकरिता पर्यावरण संवर्धन काळाची गरज असुन वृक्षारोपण मोहिमेत सर्वांचा सहभाग असायला पाहिजे तरच पर्यावरण समतोल राखला जाईल त्याकरिता वृक्षलागवड काळाची गरज आहे.या मोहिमेत सहभागी होऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी याविषयी उचललेले पाऊल दिशादर्शक आहे .जनतेकरिता कर्तव्य बजावत असताना देखील सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जंगल गार्डन ग्रुप करत असलेल्या कामाचे कै्ातुक केले .

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनचे अनेक अधिकारी व कर्मचारी, परिसरातील सहकारी मोठ्या प्रमाणात हजर होते. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक एस इंगळे,राजेंद्र ढेंगळे,पोलीस हवालदार भांगे, ठोंबरे, गायकवाड , सेलुकर, पोलीस शिपाई दातार, पाटील,पोलीस शिपाई वाबळे,वाळुंज, शेळके,झुंजा, काळे, कदम महिला पोलीस अंमलदार आणि मनोज माकोडे, एकनाथ फटांगडे, अजिंक्य पोटे,रमेश पामलवाड,अनिल जगताप, ज्योती दरंदले,शैला इचके ,मिनाआखाडे, व लायन्स क्लब पिंपरी-चिंचवड स्टार्सच्या प्रिती बोंडे ,विद्या वकारे,जितेश वकारे,जंयंत बोंडे तसेच इतर अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी, पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.यावेळी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या पर्यावरणाच्या कामाची माहिती सर्वांना दिली व सर्वांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी अमित पाटील साहेब, भूगोल फाउंडेशनचे सर्वच सदस्य, जंगल गार्डनचे विश्वनाथ टेमगिरे ,संतोष दै्ांडकर ,गिरीष वाघमारे,निवृत्ती अमुप,स्वदीप अडसुळ यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच वृक्ष व संवर्धन विभाग पिंपरी-चिचवड महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक वाळुंज , प्रदिप देसाई प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,घोडेगाव,ता. आंबेगाव.जिल्हा पुणे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.