मोशी- भूगोल फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक स्वास्थ्य व महिला सुरक्षाविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .
या कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनाली गोडबोले पाटील, ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गटाच्या सदस्या जयश्री तुंगार, सविता पाटील,माया अमृतकर, संतनगर मधील ज्येष्ठ महिला स्मिता देशपांडे, विमल शेळके, अनुराधा शिंदे, पुष्पा थोरात, चव्हाण काकू, मंदा मानकर यांच्या हस्ते करण्यात आली .
भूगोल फाउंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सोनाली गोडबोले पाटील, यांनी महिलांना सुरक्षाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गटाच्या तज्ञसदस्या .जयश्री तुंगार, सविता पाटील,.माया अमृतकर यांनी ‘महिलांचे मानसिक स्वास्थ्य जाणीव जागृती उपक्रमा’ अंतर्गत महिलांसोबत संवाद साधला .मोशी संतनगर येथील पूर्णब्रह्म हॉल, येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
फाऊंडेशनची पर्यावरणाची शपथ सर्वांना देण्यात आली. उद्योजक सुनिता बिरादार, सेजल वाळूंज, रोहिणी वाळूंज ,संगिता इचके,आशा वाळुंज,आदिका वाळुंज,सुरेखा गावडे,रंजना नाणेकर,विद्या पाटील,स्वाती मुरकर,रेखा मुळे,मेघा पाटील यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका अश्विनी वाबळे, सामाजिक कार्यकर्त्या नीलम लांडगे, आरोग्य प्रशिक्षक कविता पाचपुते यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित सर्व महिलांना व पाहुण्यांना भुगोल फाउंडेशनच्या प्रथेप्रमाणे झाडाचे एक रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच झाडे लावा झाडे जगवा, प्लॅस्टिकचा वापर टाळा,पाणी जपून वापरा,स्वच्छता पाळा,आपला कचरा सुका कचरा वेगळा करा असे पर्यावरणासाठी संदेश देण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूगोल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलनाना वाळूंज यांनी मार्गदर्शन केले.
भुगोल फाऊंडेशनच्या महिला सदस्या ज्योती दरंदले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मीना बिरंगळ यांनी भूगोल फाऊंडेशन च्या कार्याची माहिती दिली. शोभाताई फटागंडे यांनी आभार मानले .
