ब्रेकिंग न्यूज

खेडच्या दुर्गम भागातील वंचितांची दिवाळी झाली गोड-भुगोल फाउंडेशनचा उपक्रम

Share

पिंपरी -एक हात मदतीचा माणुसकीचा दिप म्हणजे दिवाळी या उपक्रमा अंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान धरणाच्या पश्चिमेकडील भागात  निसर्गरम्य  खेड पश्चिम भागातील चिखलगाव , माजगाव,कळमोडी या दुर्गम भागात आदिवासी कातकरी गरीब गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे,लहान मुलांना कपडे व शालेय साहित्य देण्यासाठी जाऊन हा उपक्रम राबविण्यात आला.

आपल्या वसुंधरेने आपणास अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. आपणही सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे , निसर्गाचे आपण काही तरी देणे लागतो म्हणुन सालाबादप्रमाणे याही वर्षी अध्यक्ष  विठ्ठल नाना वाळुंज यांच्या संकल्पनेतून आदिवासी,कातकरी ,गरीब व गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या दुर्गम भागात जाऊन आपल्या भूगोल फाउंडेशन चे एक सहकारी अॅड संभाजीराव मिंडे यांच्या मार्गदर्शनाने  वंचित कुटुंबाना दिवाळी फराळ, स्रियांना साड्या, लहान मुलामुलींना कपडे, टी- शर्ट व शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

भेटवस्तू घेतल्यानंतर त्यांना होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. ते खुश झालेले पाहून भूगोल फाउंडेशन च्या सदस्यांनाही आपण जे सत्कार्य करत आहोत त्यामुळे मनाला समाधान वाटत होते.या कार्यासाठी मुंलीचे कपडे नाणेकर यांनी अत्यल्प दरात ,भंडारी कलेक्शन यांनी नऊ वारी साड्या अत्यल्प दराने दिल्या त्यामुळे आमचा चांगल्या मदतीचा मार्ग अजुन सुखकर झाला. सुरुवातीला चिखलगाव नंतर कळमोडी,माजगाव गावातील संतोष कदम व सदाशिव शेलार मामा यांनी आपल्या संस्थेच्या सर्वांचे स्वागत केले .

भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांनी आपण करत असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रम व पर्यावरण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गडकिल्ल्यांची साफसफाई, प्लॅस्टिक मुक्ती, नदी स्वच्छता,लोकप्रबोधन, जनजागरण इ. उपक्रमाची माहिती देऊन गावकर्यांनीही असे उपक्रम राबवावेत अशी सूचना केली. भेटवस्तूंचे वाटप झाल्यानंतर चासकमान धरणाच्या जवळील श्री बेलेश्वर मंदिराच्या प्रांगणात श्री संभाजी मिंडे यांनी व्यवस्था केलेल्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भूगोल फाउंडेशन ,संतनगर मित्र मंडळ,इंद्रायणी सेवा संघ,आपला म्यझिकल ग्रुप,वटेशवर महिला भजनी मंडळ,तसेच संस्थेचे  सहकारी या उपक्रमात प्रत्यक्ष सामील झाले होते.

इंद्रायणी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल वीर, बाळासाहेब कराळे, निकुंज रेंगे,एकनाथ फटांगडे, मनोज माकोडे,सुनील काटकर,सुनील बांगर,रमेश पामलवाड,सुहास चव्हाण, रथीश पिल्ले, विशाल शेवाळे,कृष्णा चव्हाण, भुगोल फाउंडेशन महिला आघाडीच्या शोभा फटांगडे, उद्योजक सुनिता बिरादार,ज्योती दरंदले, गवळीनगर पतसंस्थेच्या संचालिका आशा वाळुंज, संगिता इचके, मुख्याध्यापिका संध्या वाळुंज, रोहिणी वाळुंज, सिंधु नवले,रंजना नाणेकर, मीरा आदक,आदिका वाळुंज, सेजल वाळुंज, अपूर्वा वाळुंज, श्रावणी किबिले, श्रेया किबिले सहभागी होते

या उपक्रमासाठी  दानशूर व्यक्तींनी मदत केली . त्यांच्या आर्थिक योगदानामुळे जवळपास १०० कुटुंबाना म्हणजे जवळपास ४०० पेक्षा जास्त लोकांना, मुलामुलींना ही दिवाळी भेट, नविन कपडे ,शालेय साहित्य चासकमान धरणाच्या बॅकवाॅटर परिसरात वृक्षवेलीनी नटलेल्या निसर्गरम्य भागातील लोकांची दिवाळी गोड केली.यावेळी कळमोडी माजी सरपंच सदाशिव शेलार, सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम चिखलगाव हजर होते.

ग्रामस्थांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा करून भूगोल फाउंडेशन च्या सर्वांचे आभार मानले.