भोसरी (वेध न्यूज) भीमाशंकर परिसरातील अति दुर्गम वाड्या वस्त्यावरील जांभोरे, फळवदे, कोकण कडाच्या खाली असलेल्या पदरवाडी भागातील आदिवासी ,कातकरी समाजातील गरजू बांधवाना आर्थिक मदत, दिवाळी फराळ,साड्या कपडे ,मुलामुलींना कपडे ,पणत्या तसेच शालेय साहित्य भोसरीतील भूगोल फाउंडेशन च्या वतीने देण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे , निसर्गाचे आपण देणे लागतो या भावनेतून दरवर्षीप्रमाणे भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. या दुर्गम भागातील भीमाशंकर, भोरगिरी आणि पदरवाडी या संयुक्त ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय हिले यांच्या सहकार्याने गरजू लोकांना स्थानिक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींच्या समक्ष वंचित कुटुंबाना दिवाळी फराळ, स्रियांना साड्या, लहान मुलामुलींना कपडे, टी- शर्ट व शाळेतील मुलांना वह्या व पेन ,पेन्सीलचे वाटप करण्यात आले.
भेटवस्तू मिळाल्यानंतर सर्वांचे चेहरे हरखून गेले होते. भूगोल फाउंडेशन च्या सदस्यांनाही योग्य ठिकाणी मदत केल्याचे मनाला समाधान वाटत होते.
सुरुवातीला जांभोरी गावातील सरपंच उपसरपंच यांनी संस्थेच्या सर्वांचे स्वागत केले. भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज यांनी आपण करत असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रम व पर्यावरण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गडकिल्ल्यांची साफसफाई, प्लॅस्टिक मुक्ती, नदी स्वच्छता,लोकप्रबोधन, जनजागरण इ. उपक्रमाची माहिती देऊन ग्रामस्थांनीही असे उपक्रम राबवावेत अशी सूचना केली.
साहेबराव गावडे, निकुंज रेंगे, सायकल व पर्यावरण मित्र श्री सतीश पावसे, शशिकांत वाडते,अनिल घाडगे, राजेश किबिले, ग्रामीण साहित्यिक प्रा.लक्ष्मण वाळुंज, दत्तात्रय होजगे सर, शशिकांत वामन सर ,दादाभाऊ लोटे सर , सामाजिक कार्यकर्ते विशाल शेवाळे, कृष्णा चव्हाण ,यश इचके, केदार पावसे,बाळासाहेब शिंदे, ओमप्रकाश.पार्थ दरंदले, पियुष गावडे,नचिकेत शेळके , महिला आघाडीच्या शोभाताई फटांगडे ,गवळीनगर पतसंस्थेच्या संचालिका आशा वाळुंज,रोहिणी वाळुंज, ज्योतीताई दरंदले,लिना नायडु, सुनिता बिरादार, संगिता इचके मीना आखाडे,सिंधु नवले,सुप्रिया पावसे,विमल शेळके,अनुराधा शिंदे ,सुनिता लोटे मॅडम, विद्या पाटील,स्वाती मुरकर, कु.सेजल वाळुंज, कु.अपूर्वा वाळुंज,वैष्णवी इचके,श्रावणी किबिले, सोनी बिरादार यांसह भूगोल फाउंडेशन व संतनगर परिसरातील नागरिकांनी योगदान दिले.
सुमारे १०० पेक्षा जास्त कुटुंबातील ३५० पेक्षा जास्त सदस्यांची दिवाळी गोड झाल्याची भावना जांभोरी गावचे सरपंच अशोक भोकटे फळवदे गावातील शांताराम केंगले व इतर ग्रामस्थांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .

