भोसरी -पिंपरी चिंचवड शहरात महाशिवरात्री उत्सवा निमित्त भाविकांनी महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अमरनाथ सेवा ट्रस्ट पुणे भोसरी यांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सवानिमित्त फराळ वाटप करण्यात आला. मोशी प्राधिकरण संतनगर आहार हॉटेल कॉर्नर या ठिकाणी भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला .सकाळी सात पासूनच भक्तांसाठी साबुदाणा खिचडी तसेच केळी वाटप सुरु करण्यात आले. संघ्याकाळपर्यंत सुमारे दोन हजार भाविकांनी फराळाचा लाभ घेतला.
या उपक्रमास नगरसेविका नम्रता लोंढे ,सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, नगरसेवक तुषार सहाणे , नगरसेवक डॉ. सुहास कांबळे ,माजी नगरसेवक विलास मडिगेरी, सामाजिक कार्यकर्ते शिवराज लांडगे , संतोष लांडगे यांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले.
अमरनाथ सेवा ट्रस्ट च्या वतीने गेली १६ वर्ष देवस्थानच्या ठिकाणी हा फराळ वाटप कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येतो. मोशी प्राधिकरण परिसरात फराळ वाटपाचे हे पहिलेच वर्ष आहे. श्रावण महिन्यात देखील प्रत्येक सोमवारी फराळ वाटप करण्याचा मनोदय अमरनाथ सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष काळे यांनी व्यक्त केला.

अमरनाथ सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून दरवर्षी भाविकांसाठी कमीतकमी खर्चात अमरनाथ यात्रा ,काशी यात्रेचे आयोजन करण्यात येते. तसेच नसर्गिक आपत्कालीन प्रसंगात तातडीची मदत देण्यात येते.
या उपक्रमाचे संयोजन अमरनाथ सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष नितीन थोरात उद्योजक प्रशांत वाघ ,सचिन काळे, प्रमोद वाघ , प्रशांत अष्टेकर , महेश दळवी, नंदकुमार भास्कर,गणेश मिंडे , संतोष वरे, धनेश कानपिळे, रोहिदास डोके, निलेश भागवत , शुभम काळे ,तन्वी काळे, स्वरूप वाघ यांनी केले.
