भोसरी (वेध न्युज ) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी जेष्ठ नागरिक महिला युवक यांचा महासागर लोटला होता .फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी रांगोळीच्या पायघड्या यामुळे सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले होते. तत्पुर्वी त्यांनी भोसरीगाव चे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या चरणी श्रीफळ वाढविले . लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन गव्हाणे यांनी उमेदवारी अर्ज भोसरी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला .
यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते .
भोसरी मतदार संघामध्ये परिवर्तनाची लढाई अजित गव्हाणे यांनी सुरु केली परिवर्तनाच्या या लढाईला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठबळ दिले . महाविकास आघाडीने अजित गव्हाणे याना उमेदवारी जाहीर करत भोसरीतील भ्रष्टाचार दहशतवाद आणि मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केले असल्याचे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले .
भोसरी विधानसभेत परिवर्तन नक्कीच अजित गव्हाणे
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष सुरु असलेल्या अनागोदी कारभाराच्या विरोधात परिवर्तनाची लढाई सुरु आहे आजची पदयात्रेतील गर्दी हीच परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे सांगितले .

